cyber crime

(Online fraud in cyber crime, causes of internet fraud, types of online fraud in India)

ऑनलाइन फ्रॉडच्या घटनांमध्ये गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपली वाचलं असेल. आजकाल वेगवेगळ्या पद्धतीने सायबर चोरटे लोकांना गंडा घालताना दिसत आहेत. याबाबत जमतारा सारखी वेबसिरीज देखील येऊन गेली आहे. मात्र सायबर चोरट्यांचं काम आपणंच सोप करुन ठेवतो, असं जर तुम्हाला सांगितलं तर विश्वास ठेवाल का? 

सर्वेद्वारे धक्कादायक माहिती समोर (Online Fraud survey)

एका सर्वेद्वारे ही धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. भारतातील अनेक जण त्यांचे आर्थिक व्यवहारांसंबंधीचे महत्वाचे पासवर्ड मोबाईलमध्येच सेव्ह करुन ठेवतात, असा हा सर्वे सांगतो. ही एक अत्यंत धोक्याची गोष्ट आहे ज्यामुळे सायबर चोरटे तुमच्या पासवर्डची सहज चोरी करू शकतात आणि तुमची ऑनलाइन फसवणूक होऊ शकते.

Local Circles नावाच्या एका कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेनुसार असे निष्कर्ष काढले आहेत की, जवळपास 17 टक्के लोक हे त्यांचे मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड मोबाइल फोनमध्ये सेव्ह करून ठेवतात. मोबाईल फोनमध्ये कॉन्टॅक्ट किंवा नोट्सच्या स्वरूपामध्ये त्यांनी हे पासवर्ड सेव्ह केलेले असतात. तर केवळ 14 टक्के लोक पासवर्ड पाठ करुन ठेवतात, असं देखील हा सर्वे सांगतो.   

काही जण त्यांच्या पासवर्डसंबंधीत माहिती कम्प्युटर, लॅपटॉपमध्ये सेव्ह करुन ठेवतात तर अनेक जण त्यांच्या फायनान्शियल गोष्टीं संदर्भातले महत्त्वाचे पासवर्ड कुटुंबातील व्यक्ती किंवा त्यांच्या स्टाफ सोबत शेअर करतात, असं देखील हा सर्वे सांगतो.

या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या 88 टक्के लोकांनी अशी माहिती दिली आहे की त्यांनी वेगवेगळ्या कामांसाठी उदाहरणार्थ एप्लीकेशन, आयडी प्रूफ किंवा बुकिंग यासाठी आधार कार्डची माहिती शेअर केली आहे. आधार कार्डची माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागल्यास देखील ऑनलाईन फ्रॉडची शक्यता असते. अशातच एखाद्या व्यक्तीचा फोन जर चोरी झाला तर तो अत्यंत सहज रीतीने बँक अकाउंट मधले पैसे गायब करू शकतो

फायनान्शियल फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ (Increase in Online fraud)

गेल्यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर 2022 साठी आरबीआयने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. या काळामध्ये फायनान्शियल फ्रॉडच्या जवळपास 5406 घटना झाल्याची माहिती देण्यात आली होती. तर त्याच्या मागच्या वर्षी याच काळात फायनान्शिअल फ्रॉडच्या 4069 घटना झाल्या होत्या. अनेक जणांकडून त्यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन फसवणुकीची माहिती देखील दिली जात नाही किंवा पोलिसांमध्ये या घटनेमध्ये तक्रार केली जात नाही.

लोकल सर्कल्स या संस्थेने भारतातील 337 जिल्ह्यांमध्ये जाऊन जवळपास 32 हजार लोकांच्या प्रतिक्रिया घेत हा सर्व केला आहे आणि त्याद्वारे ते या निष्कर्षापर्यंत आले आहेत. या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये 35 टक्के महिला तर 65 टक्के पुरुषांचा सहभाग होता.

त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवत असाल तर ते आत्ता पासूनच बंद करायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *