mobile photography tips

(What is Mobile photography, How to use mobile photography, Mobile photography ideas, Mobile photography tips, Mobile photography accessories)

मोबाईलमुळे आपल्या आसपासचं जग किती बदललंल ते वेगळं काही सांगायची गरज नाही. हे बदललेलं जग टिपण्यासाठी मोबाईलचा कॅमेरा अनेकजण वापरतात. सध्या मोबाईल कॅमेरामध्ये नवनवीन सेन्सर आणि इतर अपग्रेड्समुळे मोबाईल फोटोग्राफीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. अगदी साध्या-साध्या मोबाईलमध्ये सुद्धा 20 मेगापिक्सल, 30 मेगापिक्सल, 40 मेगापिक्सलपासून 100 मेगापिक्सल पर्यंतचा कॅमेरा देखील आपल्याला आजकाल पाहायला मिळतो.

मोबाईलच्या कॅमेरा अॅपमध्ये आजकाल पोर्टट्रेट मोड, नाईट मोड सारखे वेगवेगळे फीचर्स देखील आलेले आहेत. त्याचा वापर करुन देखील छानछान फोटो काढता येतात.

फोट्यूटोरियल डाटा (Photutorial data) ने केलेल्या एका सर्वेनुसार 2021 या एका वर्षात जगभरात जवळपास 1.2 ट्रिलियन फोटो क्लिक केले गेले होते. 2022 मध्ये ही संख्या 1.72 ट्रिलियन इतकी होती. विचार करा किती मोठ्या प्रमाणावर ती फोटो काढले जातात. या रिपोर्टचा असा अंदाज आहे की 2025 पर्यंत हा आकडा 2 ट्रिलियन इतका होऊ शकतो. यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की यापैकी 90 टक्केपेक्षा जास्त होतो हे केवळ स्मार्टफोनद्वारे क्लिक करण्यात आले होते.

तुम्ही देखील मोबाईल फोटोग्राफी करत असाल तर आम्ही तुम्हाला मोबाईल फोटोग्राफी बद्दलच्या पाच भन्नाट पाच टिप्स सांगणार आहोत. याचा वापर करुन तुम्ही सुद्धा मोबाईल फोटोग्राफी मधले एक्स्पर्ट बनू शकता.

1. मोबाईल कॅमेरा अॅपमधील सेटिंग्स समजून घ्या (Mobile Photography tips)

चांगल्या फोटोग्राफीसाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा कॅमेरा आणि त्याच्या सेटिंग याची नेमकी माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक मोबाईलच्या कॅमेरा ॲपमध्ये सेटिंग ऑप्शन असतो. या सेटिंगमधून फोकस आणि एक्सपोजर सारख्या गोष्टी तुम्हाला बदलता येतात. काही मोबाईल कॅमेरा ॲप्समध्ये Aparture सारख्या सेटिंग सुद्धा तुम्हाला चेंज करता येऊ शकतात. या सेटिंगमध्ये बदल करुन तुम्ही चांगल्यात चांगला फोटो काढू शकता.

2. लाईटचा योग्य वापर 

मोबाइल फोटोग्राफी करत असताना आपल्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या प्रकाश असेल त्याचा योग्य वापर केला केला गेला पाहिजे. फोटो काढत असताना सूर्यप्रकाश कोणत्या दिशेला आहे, प्रकाश नेमका कुठून येतोय याची योग्य दक्षता घेतली गेली पाहिजे. योग्य उजेडामध्ये घेतलेला फोटो इतर फोटोपेक्षा उठून दिसतो हे आपण पाहिले असेल. त्यामुळे फोटो काढताना आपण ज्या गोष्टीचा, वस्तूचा, व्यक्तीचा फोटो काढत आहोत त्यावरचा लाईट योग्य आहे याची काळजी घ्या. तसेच जर योग्य प्रकाश नसेल तुम्ही पोर्टेबल लाईटचा देखील वापर करु शकतात. आज-काल बाजारामध्ये अनेक पोर्टेबल उपलब्ध आहेत.

3. स्टॅबिलिटी 

मोबाईल फोटो काढताना आपला हात हलता कामा नये. फोटो काढताना मोबाईल स्टेबल धरून ठेवणे फार गरजेचे आहे. जर शक्य असेल तर मोबाईल दोन्ही हातांनी पकडावा किंवा त्याला ट्रायपॉड किंवा दुसऱ्या कशाचा तरी आधार द्यावा. फोटो काढताना मोबाईल हलल्यामुळे फोटो हा थोडासा ब्लर आल्याचं आपण पाहिलं असेल. तसेच जर तुम्ही कमी प्रकाशामध्ये फोटो घेत असाल तर अशावेळी मोबाईल हा स्टेबल असणं फार गरजेचे आहे. जेव्हा प्रकाश कमी असतो तेव्हा फोटोला क्लिक झाल्यानंतर एक्सपोजर ॲडजस्टमेंटसाठी वेळ लागत असतो. अशा वेळेला आपण जर मोबाईल हलला तर पूर्ण फोटो खराब होऊ शकतो त्यामुळे स्टॅबिलिटी हा मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो.

4. स्टोरेज

तुमच्या फोन मधील स्टोरेज हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आजकालच्या फोनमध्ये साधारण 128 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त स्टोरेज दिलेलं असतं. तुमच्याकडे जर तीन-चार वर्षांपूर्वी घेतलेला जुना फोन असेल तर त्यामध्ये देखील 64 जीबी इतकं स्टोरेज असेलच. बऱ्याचदा फोन मध्ये व्हिडिओज, फोटोज, फाईल मोठ्या प्रमाणावर असल्यास अवेलेबल स्टोरेज कमी असतं. अशावेळी आपण जो फोटो काढतोय त्या फोटोची साईज देखील जास्त असते त्यामुळे अडचण होऊ शकते. कधीकधी नवीन फोटो काढताना स्टोरेज कमी असल्यास जुने फोटो तुम्हाला डिलीट करावे लागू शकतात. त्यामुळे आपल्या फोटोंचा बॅकअप असणं गरजेचं आहे. त्यासाठी एखाद्या मायक्रो एसडी कार्डची मदत देखील आपण घेऊ शकता.

5. फोटो एडिटिंग अॅप्स

गुगल प्लेस्टोअर, अॅपल स्टोरवर फोटो एडिटिंगचे अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. यापैकी Lightroom आणि Snapseed हे दोन अॅप तुम्ही वापरू शकता. दोन्हीही अॅप वापरायला अगदी सोपे आहेत. या ॲपद्वारे तुम्ही फोटोमध्ये अगदी थोडा चेंज करून सुद्धा तुमच्या फोटोला आणखी चांगला बनवू शकता. या अॅप्सचा वापर करुन फोटो कलर ग्रेडिंग करू शकता. या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या फोटोचा कलर टोन चेंज करू शकता, तुमच्या फोटोचा एक्स्पोजर, ब्राईटनेस अॅडजस्ट करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *