iPhone 15 look

(iphone 15 first look, iPhone 15 launch date Mumbai, apple iPhone 15 pro max)

Apple या जगप्रसिद्ध मोबाईल फोन बनवणाऱ्या कंपनीचा iPhone 15 हा नवीन आयफोन येत्या सप्टेंबरमध्ये बाजारात येणार आहे. त्यापूर्वीच iPhone 15 सिरीज बाबत उत्सुकता दिसत आहे. हा नवा आयफोन कसा असेल आणि त्याचे फिचर्स काय असतील याबाबत अनेक अंदाज वर्तवले जात असताना आता फोनच्या डिजाईनबाबत नवी माहिती समोर आली आहे. नवीन आयफोनचं डिजाईन यापूर्वीच्या मोबाईलपेक्षा हटके असण्याची शक्यता जास्त दिसत आहे.

कंस असेल iPhone 15 चं डिजाईन?

iPhone 15 सिरीजमध्ये टायटॅनियम फ्रेम असू शकते असा अंदाज काही रिपोर्टनी वर्तवला आहे. तसेच कॅमेरा सेन्सर साईजमध्ये देखील अपग्रेडेशन केलेले दिसणार आहे. यासोबतच आयफोनची ओळख असलेले म्यूट बटन आता नव्या फोनमध्ये दिसणार नाही असे देखील काही रिपोर्टनूसार सांगण्यात येत आहे.

यापूर्वीच्या आयफोनमध्ये व्हॉल्युम बटन आणि म्यूट बटन फिजिकल स्वरूपात असायचे. मात्र येत्या काळामध्ये याठिकाणी फिजिकल बटनच्या ऐवजी Haptic button असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. आयफोनमधील म्यूट बटन यापूर्वी फोनच्या साईडला देण्यात यायचे ते आता नव्या आयफोनमध्ये नसले. 

सिमकार्ड स्लॉट नसणार

नव्या आयफोनमध्ये सिमकार्ड साठी स्लॉट देण्यात येणार नाही. यापूर्वी लाँच करण्यात आलेल्या iPhone 14 मध्ये देखील अमेरिकेत सिमकार्ड स्लॉट देण्यात आलेला नव्हता. भारतात ग्राहकांना सिमकार्ड स्लॉट आणि ई-सिम असे दोन्ही पर्याय देण्यात आले होते. नव्या आयफोनमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांना ई-सिमचा पर्याय निवडावा लागणार आहे.  

कसा असेल कॅमेरा?

iPhone 15
iPhone 15

iPhone 15 मध्ये कॅमेऱ्याच्या साईजमध्ये देखील बदल दिसू शकतो. या फोनच्या कॅमेरामध्ये अद्ययावत सेन्सर टेक्नॉलॉजी असेल ज्यामुळे अधिक स्पष्ट आणि उच्चतम दर्जाचे फोटो या कॅमेराद्वारे मिळू शकतील.

iPhone 15 मध्ये Type C चार्जिंग पोर्ट

iPhone 15 पासून आयपफोनमध्ये Type C चार्जिंग पोर्टचा समावेश करण्यात येणार आहे. नव्या फोनच्या लिक झालेल्या डिजाईनमध्ये देखील तसे दिसून येत आहे.

Apple ही एकमेव कंपनी आतापर्यंत USB C चार्जिंग पोर्ट आपल्या फोनमध्ये देत नाही. आतापर्यंतचे सर्व आयफोन लायटनिंग पोर्टसह येतात. या गोष्टीमुळे आयफोन युजर्सना अनेकदा अडचण देखील होते. मात्र युरोपियन युनियनने केलेल्या कायद्यानूसार भविष्यात सर्व मोबाईल फोन्सना USB C चार्जिंग पोर्ट असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे Apple ला देखील आता यापुढे लाँच होणाऱ्या मोबाईल फोनमध्ये USB C पोर्टचा समावेश करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *