whatsapp edit message button

(How can I edit whatsapp text, How do I use edit feature on whatsapp, whatsapp allows edit messages, whatsapp edit message android, whatsapp edit message ios, Whatsapp edit message feature)

तंत्रज्ञान पुढे जातं तसं अनेक गोष्टी बदलताना दिसतात. एक काळ होता की Whatsapp वर एखाद्याला एकदा मेसेज पाठवला की झालं. चुकीचं काही गेलं असलं तरी डिलीट किंवा एडिट करायचा पर्याय नव्हता. नंतर व्हॉट्सअॅपनं ही अडचण लक्षात घेत पाठवलेला मेसेज डिलीट(Whatsapp message delete option) करायचा पर्याय उपलब्ध करुन दिला. पण आता त्याच्यापुढे एक पाऊल टाकत व्हॉट्सअ्ॅपने पाठवलेला मेसेज एडिट करायचा पर्याय आपल्या युजर्सना दिला आहे. (Whatsapp gives message edit option to users)

व्हॉट्सअॅपच्या Android आणि iOS अशा दोन्हीही युजर्सना हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी एडिट बटनचा वापर करुन पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल करता येणार आहे. एखादा मेसेज पाठवल्यानंतर पुढील १५ मिनिटांसाठीच हा पर्याय उपलब्ध असेल. १५ मिनिटांनंतर पाठवलेला मेसेज एडिट करता येणार नाही. 

कसा वापरायचा हा पर्याय (How to use whatsapp edit message feature)

  • हा पर्याय वापरण्यासाठी आपल्याला जो मेसेज एडिट करायचा आहे त्यावर लाँग प्रेस करुन ठेवा. 
  • त्यानंतर एडिट ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेजमध्ये बदल करता येईल.
  • एडिट पर्याय वापरुन सुधारित मेसेज पुन्हा पाठवता येईल. 
  • हा एडिट ऑप्शन मेसेज पाठवल्यानंतर पुढील १५ मिनिटांच्या आतच वापरता येईल. त्यानंतर हा पर्याय दिसणार नाही. 

महत्वाचे

तुम्हा ज्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज एडिट केला असेल त्या व्यक्तीकडे व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन असणे गरजेचे आहे. (whatsapp edit message not working) समोरील व्यक्तीचे व्हॉट्सअॅप अपडेटेड नसल्यास त्यांना एडिट केलेला मेसेज पाहता येणार नाही. त्याऐवजी त्यांना एक नोटिफिकेशन दिसेल. या नोटिफिकेशनमध्ये समोरील युजरला व्हॉट्स्अॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करण्याची सूचना केली जाईल.

हे देखील नक्की वाचा :

आता Whatsapp chat lock करा, कोणीही वाचू शकणार नाही तुमचं ‘प्रायवेट चॅटिंग’

Mobile Photography tips : या पाच टिप्स फॉलो करा आणि बना मोबाईल फोटोग्राफी एक्सपर्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *