whatsapp chat lock marathi

(Whatsapp Chat lock feature, Can you lock a chat on whatsapp, How do I turn on chat lock on Whatsapp, What is chat lock feature in Whatsapp, How do I turn on chat lock, Whatsapp chat lock android, whatsapp chat lock iphone)

लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेल्या Whatsapp ने नुकतंच एक नवीन भन्नाट फिचर लाँच केलं आहे. या फिचरमुळे आता तुमचं खासगी चॅटिंग अधिक सुरक्षित होणार आहे. व्हाट्सअॅपच्या नवीन फिचरमुळे युजरला प्रायवेट चॅट लॉक करुन ठेवता येणार आहेत. युजरच्या परवानगी शिवाय कोणीही ते चॅट ओपन करु शकणार नाही. (Whatsapp launched chat lock feature)

Whatsapp चॅट लॉक फिचर नेमकं काय आहे? (What is whatsapp chat lock feature)

व्हाट्सअॅपने या नवीन फिचरला चॅट लॉक (Chat Lock) असे नाव दिले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचे प्रायवेट चॅट एका फोल्डरमध्ये सुरक्षित ठेवू शकतात. हे चॅट पासवर्ड प्रोटेक्डेड असतील. पासवर्ड शिवाय या चॅटचं फोल्डर कोणीही ओपन करु शकणार नाही.

चॅट लॉकमध्ये युजर एखाद्या दुसऱ्या युजरसोबत झालेला संवाद किंवा एखाद्या ग्रुपवरील संवाद लॉक करु शकतो. अशाप्रकारे सुरक्षित केलेला संवाद नोटिफिकेशनमध्ये देखील वाचता येणार नाही.

व्हाट्सअॅप युजरला अनेकदा त्यांचा फोन दुसऱ्याचा हातात पडल्यानंतर मेसेजेस वाचले जाण्याची भिती असते. अशा युजर्सना हे फिचर फायद्याचे ठरणार आहे.

चॅट लॉक फिचर कसे वापराल? (How to use chat lock feature)

  • व्हाट्सअॅपचे चॅट लॉक फिचर Android आणि iOS या दोन्ही ओएसवर उपलब्ध आहे.
  • यासाठी युजरला व्हाट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करावे लागेल.
  • ज्या व्यक्तीसोबतचे किंवा ग्रुपवरील चॅट लॉक करायचे आहे अशा व्यक्तीच्या किंवा ग्रुपच्या प्रोफाईल फोटो वर क्लिक केल्यानंतर चॅट लॉकचा ऑप्शन दिसेल.
  • चॅट लॉक संबंधित सेटिंग युजरला करता येतील. यासाठी फोनचा पासवर्ड किंवा बायोमेट्रिकचा वापर करता येईल.
  • व्हाट्सअॅप ओपन केल्यानंतर लॉक केलेले चॅट एका फोल्डरमध्ये दिसतील.
  • लॉक केलेल्या चॅटवर टॅप करुन पासवर्ड एंटर करत ते चॅट ओपन करता येतील.

चॅट लॉक फिचर वापरताना हे लक्षात ठेवा :

ज्या व्यक्तीचे, ग्रुपचे चॅट तुम्ही लॉक कराल त्यांना तुम्ही चॅट लॉक केल्याची माहिती मिळणार नाही.
या फिचरमुळे केवळ चॅट लॉक होतील आणि त्याचे नोटिफिकेशन लपवले जातील मात्र कॉल्स लॉक होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *