Apple store mumbai

(Apple store India, Apple store Mumbai, Apple store Delhi, is apple store coming to india, when was the first apple store opened in india)

मोबाईल कंपन्यांमधलं सर्वात मोठं नाव असलेली Apple ही कंपनी आता भारतामध्ये स्टोअर उघडत आहे. भारतामध्ये आतापर्यंत अ्ॅपलचं एकही अधिकृत असं स्टोअर नव्हतं. मात्र Apple आता भारतातल्या दोन शहरांमध्ये स्टोअर उघडणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
Apple चं पहिलं स्टोअर हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये उघडण्यात येणार आहे, तर दुसरं स्टोअर ॲपलने देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्घाटनाला थेट अॅपलचे सीईओ येणार (Apple CEO Tim Cook visit India)

भारतातील पहिले स्टोअर मुंबईमध्ये येत्या 18 एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि या अॅपल स्टोअरचं उद्घाटन करायला थेट ॲपलचे सीईओ टीम कूक भारतात येणार असल्याची चर्चा आहे.

दिल्ली येथील अॅपल स्टोअर देखील 20 एप्रिलपासून लोकांसाठी खुले होणार आहे. या स्टोअरमध्ये ॲपलचे आयफोन, मॅकबुक यासह इतर प्रॉडक्ट लोकांना विकत घेता येणार आहेत.

अॅपलसाठी भारत ही एक महत्त्वाची आणि खूप मोठी बाजारपेठ आहे. काही महिन्यांपूर्वी अॅपलने भारतामध्ये आयफोनचं प्रॉडक्शन देखील सुरू केलं आहे. अॅपल भारतातल्या ग्राहकावर नजर ठेवून आहे. त्यामुळेच आता भारतामध्ये त्यांचे अधिकृत स्टोअर ओपन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

भारतामध्ये आतापर्यंत अॅपलचे प्रॉडक्ट विकले जात होते ते अर्थातच फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यासारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवरुन. यासोबतच वेगवेगळ्या मल्टिब्रँड रिटेल स्टोअरवर देखील अॅपलचे प्रॉडक्ट विकले जायचे.

भारतामध्ये अॅपलचं आतापर्यंत स्टोअर का नव्हतं?

भारतामध्ये अॅपलचे प्रॉडक्ट गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. गेल्या काही काळामध्ये तर आयफोनची क्रेझ आणखीनच वाढलेली आहे. मात्र तरीही भारतात अॅपल स्टोअर का नव्हतं? असा प्रश्न अनेकांना पडला होता. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग नसल्याने अॅपलला स्टोअर उघडता येत नव्हतं, असं काही रिपोर्टनूसार सांगण्यात येत आहे. गेल्या काही काळामध्ये आयफोनची भारतात मॅन्युफॅक्चरिंग सुरुवात झाल्यानंतरच अॅपल आता भारतात स्टोअर अघडत आहे.

दिल्लीमध्ये कुठे असेल अॅपल स्टोअर? (Apple store Delhi)

दिल्लीतील अ्ॅपल स्टोअर हे साकेत या भागामध्ये असेल. साऊथ दिल्लीचा भाग असलेल्या साकेत येथील एका मॉलमध्ये हे स्टोअर सुरू होणार आहे.

मुंबईमध्ये कुठे असेल अॅपल स्टोअर? (Apple store Mumbai)

मुंबईत BKC येथे अॅपलचं अधिकृत स्टोअर असणार आहे. येत्या 18 एप्रिलला सकाळी अकरा वाजता या स्टोअरचं उद्घाटन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे अॅपल स्टोअर ज्या परिसरात आहे त्याच्या आसपास जवळपास 22 ब्रँड त्यांचं दुकान उघडू शकत नाही असे अॅग्रीमेंट देखील अॅपलनं केल्याचं काही रिपोर्टनूसार सांगण्यात येत आहे. या अ्ॅग्रीमेंटनूसार फेसबुक, गुगल, एलजी, मायक्रोसॉफ्ट, सोनी यासारख्या ब्रँडचे दुकान अॅपल स्टोअरच्या आसपास नसणार आहेत. 

अॅपलने स्टोअरसाठी 11 वर्षांचे लीज अॅग्रीमेंट केले आहे. या जागेसाठी जवळपास महिन्याला 42 लाख रुपये इतकं भाडं असणार आहे. (Apple Store Mumbai rent) सोबतच अॅपलच्या रेवेन्यू शेअरमधला 2 टक्के वाटा देखील त्यांना देण्यात येणार आहे. 

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *